Telegram लाँच करणार ही हटके फिचर्स

मुंबई,दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संवाद साधणे, शॉपिंग, चित्रपट डाउनलोड, ताज्या बातम्या पाहणे आदी अनेक गोष्टींसाठी सर्वाधिक वापरले जाणारे एक अॅप म्हणजे टेलिग्राम.अन्य समाजमाध्यमांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टेलिग्राम वापरकर्त्यांसाठी काही हटके फिचर लाँच करणार आहे.
टेलिग्रामची नवीन फिचर्स
- नवीन अपडेटसह, टेलिग्राम आता प्रीमियम सदस्यांना लोगोसह प्रोफाईलसाठीसुद्धा रंग निवडण्याचा पर्याय देणार आहे. ज्यामुळे प्रोफाइल आणखीन आकर्षक दिसेल. तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये प्रोफाईल कस्टमाईज करण्यासाठी सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये ‘चॅट सेटिंग हा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही ‘रंग बदला’ या पर्यायावर टॅप करा. तसेच आयओएस वापरकर्त्यांनी “Your Colour” हा पर्याय सेटिंगमध्ये शोधा.
- टेलिग्राम ॲप अपडेट इतर युजर्सच्या अकाउंट आणि आवडीच्या चॅनेलवरून स्टोरी रिपोस्ट करण्याची परवानगी देणार आहे. वापरकर्ते स्टोरीमध्ये ऑडिओ, मजकूर आणि व्हिडीओ आदी गोष्टी रिपोस्ट करू शकतात. या स्टोरी रिपोस्ट करण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर शेअर ॲरोवर टॅप करा आणि ‘स्टोरी रिपोस्ट करा’ हा पर्याय निवडा. तसेच एखादी व्यक्ती स्वतःच्या स्टोरी कोणी शेअर केल्या पाहिजेत यावर मर्यादा ठेवू शकते. तसेच सगळ्यांसाठी व्हिजीबल असणाऱ्या स्टोरी फक्त रिपोस्ट केल्या जाऊ शकतात.
- जेव्हा वापरकर्ते ॲपमध्ये एका विशिष्ट चॅनेलमध्ये Join होतात, तेव्हा ॲप वापरकर्त्यांना काही समान चॅनेलची यादी दर्शवेल आणि या यादीमध्ये फक्त तुम्हाला सार्वजनिक चॅनेल दिसतील.
- प्रीमियम सदस्यांसाठी मर्यादित असलेले ‘व्हॉइस-टू-टेक्स्ट ट्रान्स्क्राइब’ टेलिग्राम फिचर आता विनामूल्य वापरकर्त्यांसाठीसुद्धा घेऊन येत आहे. तसेच ज्या वापरकर्त्यांकडे प्रीमियम नाही, ते दर आठवड्याला फक्त दोन व्हॉइस आणि व्हिडीओ मेसेज ट्रान्सस्क्राईब करू शकतात.
- टेलिग्रामने एक नवीन फिचर आणले आहे, ज्यात वापरकर्त्यांना त्यांच्या स्टोरीमध्ये व्हिडीओ मेसेज पोस्ट करण्याचीसुद्धा परवानगी देणार आहेत. तसेच हा व्हिडीओ मेसेज तुम्ही तुमच्या ॲप स्क्रीनवर कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता आणि त्याचा आकारही बदलू शकता. तसेच तुम्ही रिपोस्ट केलेल्या स्टोरीवर प्रतिक्रिया देण्यासाठीसुद्धा तुम्ही या फिचरचा वापर करू शकता.
SL/KA/SL
4 Dec. 2023