या ‘मेड इन इंडीया’ कार्सना परदेशात प्रचंड मागणी

 या ‘मेड इन इंडीया’ कार्सना परदेशात प्रचंड मागणी

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एक काळ असा होता की, भारतीयांना परदेशांत तयार होणाऱ्या विविध मॉडेल्सच्या कार्सनी भुरळ घातली होती. पण आता ऑटोमोबाईल क्षेत्रांत उत्तम कामगिरी कंपन्यांच्या करणाऱ्या भारतात निर्माण झालेल्या कार्सना परदेशांतून सर्वांधिक पसंती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. भारत हळूहळू कार कंपन्यांसाठी उत्पादन केंद्र बनत आहे आणि येथे बनवलेल्या कार आशियाई देशांमध्ये तसेच इतर खंडांमध्ये पाठवल्या जातात.

Hyundai Verna या मेड इन इंडीया कारने देशात आणि परदेशात लोकप्रियता मिळवली आहे आणि ती भारतात उत्पादित केलेली सर्वाधिक निर्यात होणारी कार ठरली आहे. त्यानंतर Kia Sonet, Hyundai Grand i10 Nios, Maruti Suzuki S-Presso, Nissan Sunny, Maruti Baleno, Hyundai Aura, Maruti Swift, Volkswagen Virtus यांचा क्रमांक लागतो.

भारतात बनवलेल्या कारच्या जुलैमधील निर्यात यादीवर नजर टाकल्यास, Hyundai Verna पहिल्या क्रमांकावर होती. हिच्या 5108 युनिट्सची निर्यात झाली आहे. यानंतर किआ सॉनेट दुसऱ्या क्रमांकावर होती, ज्यांच्या ४५१० युनिट्सची निर्यात करण्यात आली होती. Hyundai Grand i10 Nios ने गेल्या महिन्यात 4448 युनिट्सची निर्यात केली. त्यापाठोपाठ मारुती सुझुकी एस-प्रेसोने 4179 युनिट्सची निर्यात केली. निसान सनी पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने 3613 युनिट्सची निर्यात केली. यानंतर मारुती सुझुकी बलेनोच्या 3348 युनिट्स, ह्युंदाई ऑराच्या 2963 युनिट्स, मारुती सुझुकी स्विफ्टच्या 2939 युनिट्स, फोक्सवॅगन व्हरटसच्या 2902 युनिट्स आणि मारुती सुझुकी डिझायरच्या 2630 युनिट्सची निर्यात करण्यात आली आहे.

या सर्व भारतातील टॉप 10 सर्वाधिक निर्यात झालेल्या कार्स आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारपेठेतही या कार्सनाच ग्राहकांची सर्वाधिक पसंती लाभत आहे.

SL/KA/SL

25 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *