या भारतीयांना ऑस्कर कमिटीकडून सदस्यत्वासाठी निमंत्रण

 या भारतीयांना ऑस्कर कमिटीकडून सदस्यत्वासाठी निमंत्रण

न्यूयॉर्क, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करचा बहुमान मिळाल्यानंतर आता जागतिक पटलावर भारतीय चित्रपटसृष्टीतील कलावंतांची विशेषत्वाने दखल घेतली जात आहे.अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने RRR फेम ज्युनियर एनटीआर, राम चरण, करण जोहर, चित्रपट निर्माते मणिरत्नम आणि संगीतकार एमएम कीरावानी यांना अकादमीचे सदस्य होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर ‘ऑल टॅड ब्रीद्स’ या माहितीपटाचे निर्माते शौनक आणि आरआरआरचे सिनेमॅटोग्राफर केके सेंथिल कुमार आणि ‘नाटू नाटू’चे गीतकार चंद्रबोस यांनाही अकादमीने सदस्यत्वासाठी बोलावणे पाठवले आहे.

अकादमीने जगातील ३८९ मोठ्या व्यक्तींना सहभागी होण्यासाठी निमंत्रणे पाठवली आहेत. यामध्ये ४०% महिलांचा समावेश आहेत. सर्वांनी ही निमंत्रणे स्वीकारल्यास अकादमीच्या एकूण सदस्यांची संख्या १०,८१७ होईल. त्यापैकी ९,३७५ मतदान करू शकतील, उर्वरित सदस्य एकतर निवृत्त झाले आहेत किंवा त्यांचे निधन झाले आहे. पुढील ९६ वा ऑस्कर पुरस्कार १० मार्च २०२४ रोजी होणार आहे.

अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल क्रॅमर आणि अध्यक्ष जेनेट यांग म्हणाले, “या कलाकार आणि व्यावसायिकांचे सदस्यत्वासाठी स्वागत करताना अकादमीला अभिमान वाटतो. ते सिनेमॅटिक विषयांमध्ये विलक्षण जागतिक प्रतिभेचे प्रतिनिधित्व करतात. मोशन पिक्चर्सच्या कला आणि विज्ञानाद्वारे त्यांनी जगभरातील चित्रपट चाहत्यांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे.

अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या निमंत्रण यादीमध्ये कास्टिंग डायरेक्टर, कॉस्च्युम डिझायनर, मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाइलिस्ट तसेच मार्केटिंग आणि जनसंपर्क लोकांचा समावेश आहे.

SL/KA/SL
29 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *