या सरकारी कंपन्या आता महारत्न आणि नवरत्न श्रेणीत

 या सरकारी कंपन्या आता महारत्न आणि नवरत्न श्रेणीत

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काल (दि.३) ऑईल इंडीया आणि ONGC विदेश लिमिटेड या कंपन्यांना अनुक्रमे महारत्न आणि नवरत्न कंपन्यांच्या श्रेणीत समावेश केला आहे. ऑइल इंडियाचा सुधारित श्रेणीत समावेश केल्यामुळे आता देशात १३ महारत्न कंपन्या झाल्या आहेत.तर CPSE च्या यादीत ONGC विदेश ही १४वी नवरत्न कंपनी ठरली आहे. या महत्त्वपूर्ण बदलामुळे देशात आणि परदेशात मोठ्या गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

ऑइल इंडिया ही आधी नवरत्न कंपनी होती, तर ONGC विदेश ही मिनीरत्न CPSE होती. आता त्यांच्या श्रेणीत बदल करण्यात आला आहे. ऑइल इंडियाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४१,०३९ कोटी रुपयांचा महसूल आणि ९,८५४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. तर दुसरीकडे ONGC Videsh Ltd ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे चालवली जाते. ONGC Videsh Ltd ला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाल्यानंतर अधिक स्वायत्तता मिळणार आहे. कंपनी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याबरोबरच गुंतवणूक आणि आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम होणार आहे. ONGC Videsh Ltd ची वार्षिक उलाढाल ११,६७६ कोटी रुपये आहे. २०२२-२३ या वर्षात निव्वळ नफा १७०० कोटी झाला आहे.

या सर्व कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील आहेत, म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीच्या आहेत. ‘रत्न’ दर्जा आणि त्यानुसार श्रेणीवार नवरत्न, महारत्न आणि मिनीरत्न कंपन्या ही रचना सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठीच केली गेली आहे. सध्या १३ महारत्न कंपन्या आहेत.१४ कंपन्यांना नवरत्न दर्जा आहे. मिनीरत्न कंपन्यांची श्रेणी १ आणि श्रेणी २ या दोन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. मिनीरत्न I CPSE श्रेणीमध्ये एकूण ६२ कंपन्यांचा समावेश आहे. मिनीरत्न II CPSE यादीमध्ये एकूण ११ नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

SL/KA/SL

4 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *