‘ या ‘ चित्रपटांना मिळणार आता दुप्पट अनुदान

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देण्यात येईल असं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.
यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या विलास पोतनीस यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
२०२०- २०२२ या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनुदानासाठी अर्ज करण्यात आलेल्या ३९२ पैकी एकाही चित्रपटांचं परीक्षण करण्यात आलं नाही याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं.
आता चित्रपटांना तीन महिन्यांच्या आत अनुदान दिलं जाईल, या अनुदानासाठी २ वर्षांच्या आतल्याच चित्रपटाने अर्ज करावा यासाठी चौकट आखली जात आहे, तसंच या अनुदानात काही बदल प्रस्तावित आहेत त्याचप्रमाणे प्रेरणादायी चित्रपटांसाठी एक कोटीपेक्षा जास्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येईल , अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
अनुदानासाठी चित्रपटांची निवड करण्यासाठी परीक्षण करण्याच्या अनुषंगाने सध्या एकच चित्रपटगृह आहे आता मात्र आणखी एक चित्रपटगृह सुरू केलं जाईल परिणामी अनुदानाच्या प्रक्रियेला गती मिळेल, असं त्यांनी सांगितलं.
ML/KA/SL
2 Feb. 2023