खरीप हंगामासाठी ही खते मिळणार अनुदानीत दरात

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम, २०२५ (०१.०४.२०२५ ते ३०.०९.२०२५ पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅश (पी अँड के) खतांवर पोषक तत्वांवर आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
खरीप हंगाम २०२४ साठी अर्थसंकल्पीय आवश्यकता अंदाजे ३७,२१६.१५ कोटी रुपये असेल. ही २०२४-२५ च्या रब्बी हंगामाच्या अर्थसंकल्पीय आवश्यकतेपेक्षा अंदाजे १३,००० कोटी रुपये जास्त आहे.· शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत खतांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल. खते आणि निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलिकडच्या ट्रेंड लक्षात घेता या खतांवर सवलत देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत या खतांची सहज उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, खरीप २०२५ (०१.०४.२०२५ ते ३०.०९.२०२५ पर्यंत लागू) साठी मंजूर दरांवर आधारित, एनपीकेएस ग्रेडसह पी अँड के खतांवर अनुदान दिले जाईल.