कोल्हापूरच्या विमानतळावर आता या सुविधाही उपलब्ध होणार

 कोल्हापूरच्या विमानतळावर आता या सुविधाही उपलब्ध होणार

कोल्हापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विमानतळावरील विस्तारित आणि सुधारित टर्मिनल इमारतीचे काम १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळेे आगामी डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे अपेक्षित आहे.

कमी दृश्यमानता असतानाही विमान उतरण्यासाठी आयएलएस सिस्टीम आणि १८० सिटर एअर बस सुविधा या विमानतळावर सुरू करण्यासंबंधी काम करण्यात येत आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार नुकतेच कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. सध्या कोल्हापूर विमानतळावर सुरू असणार्‍या विस्तारित आणि आधुनिक टर्मिनल बिल्डिंगच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला.
सुमारे २७४ कोटी रुपये खर्चाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, सध्या युध्दपातळीवर या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

आजवर झालेल्या कामाची पाहणी संजीवकुमार यांनी अधिकार्‍यांसमवेत केली.तसंच खासदार धनंजय महाडिक यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनी संजीवकुमार यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला.आजवर झालेल्या टर्मिनल इमारतीच्या बांधकाम प्रगतीबद्दल संजीवकुमार यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोल्हापुरचे विमानतळ अत्याधुनिक हवाई सोयी-सुविधांनी परिपूर्ण व्हावे, यासाठी या विमानतळावर आयएलएस सिस्टीम बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. These facilities will now also be available at Kolhapur airport

पावसाळी हवा किंवा दाट धुक्यामुळं कमी झालेल्या दृश्यमान स्थितीमध्ये विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरण्यासाठी ही सिस्टीम उपयुक्त ठरणार आहे.
याचबरोबर कोल्हापूर विमानतळावर नजिकच्या काळात १८० सीटर एअरबस उतरविण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं.
यावेळी प्रोजेक्ट इंजिनिअर प्रशांत वैद्य, सरव्यवस्थापक किशनकुमार, नियंत्रण कक्ष अधिकारी राजेश अस्थाना, कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे उपस्थित होते.

ML/KA/PGB
27 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *