या बँकांनी घटवले कर्जाचे व्याजदर

 या बँकांनी घटवले कर्जाचे व्याजदर

मुंबई, दि. १० : RBIने आपल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात ०.२५% ची कपात केली आहे. त्यामुळे अनेक प्रमुख बँकांनी त्यांचे गृहकर्ज व्याजदर तात्काळ कमी केले आहेत.

HDFC
HDFC बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जांवर MCLR मध्ये ०.५% पर्यंत कपात केली आहे. नवीन दर – ८.३०%–८.५५% दरम्यान आहे. जुना दर ८.३५%–८.६०% दरम्यान होता.

PNB
पंजाब नॅशनल बँकेने त्यांचा आरएलएलआर ८.३५% वरून ८.१०% पर्यंत कमी केला आहे. हा नवीन दर ६ डिसेंबर २०२५ पासून लागू आहे. बँकेने बीएसई फाइलिंगमध्ये याची माहिती दिली.

Bank of Baroda
बँक ऑफ बडोदाने त्यांचा बेंचमार्क रिटेल कर्ज दर ८.१५% वरून ७.९०% पर्यंत कमी केला आहे. यामुळे किरकोळ कर्जाच्या ईएमआयवर किरकोळ पण लक्षणीय दिलासा मिळेल.

Indian Bank
इंडियन बँकेने त्यांचा आरएलएलआर देखील कमी केला आहे. आधी हा दर ८.२०% होता. आता ग्राहकांना ७.९५% दराने कर्ज मिळेल. हा दर ६ डिसेंबर २०२५ पासून लागू आहे.

Bank of India
बँक ऑफ इंडियाने त्यांचा रेपो आधारित कर्ज दर आरएलएलआर ८.३५% वरून ८.१०% पर्यंत कमी केला आहे. ही कपात ५ डिसेंबर २०२५ पासून लागू होईल.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *