हिवाळ्यात तेल मालिश केल्यास हे होतील फायदे

 हिवाळ्यात तेल मालिश केल्यास हे होतील फायदे

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दिवाळी संपली असली तरी आपल्या शास्त्रात बाराही महिने तेल अभ्यंगाचे किंवा स्नेहनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हिवाळा असेल तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. तेलाने शरीराला मालिश केल्याने आपली हाडे तर मजबूत होतातच, पण आपले स्नायूही चांगले राहतात. तेल मसाजची परंपरा शतकानुशतके जुनी आहे हे आपल्याला अनेक उदाहरणातून दिसून येते.आयुर्वेदातही स्नेहनाच्या म्हणजेच मालिश करण्याच्या अनेक पद्धती आणि फायदे सांगितले आहेत.These are the benefits of oil massage in winter

हिवाळ्यात केलेले स्नेहन हे बलवर्धक आणि शरीराला वर्षभर तंदुरुस्त ठेवणारे ठरते. जसे मशीनला वारंवार ऑईलिंग केले जाते तसेच शरीराला देखील गरजेचे असते, यासाठी तेल मालिश हा एक उत्तम पर्याय मनाला जातो. परंतु तेल मालिशबाबत अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न आणि समज गैरसमज असतात.

आयुर्वेदानुसार शरीर प्रकृतीनुसार तेल मालिश केल्याने वेगवेगळे फायदे मिळतात. तसेच नेहमी आंघोळीपूर्वी तेलाची मालिश करावी. कारण स्नेहनाने केल्याने शरीराला उष्णता मिळते आणि आंघोळ करताना त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत नाही. लक्षात ठेवा की स्नेहन आणि आंघोळीमध्ये काही मिनिटांचे अंतर असणे आवश्यक आहे. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनीच आंघोळीनंतर तेल मालिश करावी.

आंघोळीनंतर तेल लावले तर तुमच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा तेलकटपणा आणि तेलामुळे येणार उग्र वास त्रासदायक ठरू शकतो. तसेच आंघोळीनंतर तेल लावले तर कपडे खराब होतील आणि तुम्हाला जास्त पुरळ आणि खाज येण्याची समस्या होऊ शकते.These are the benefits of oil massage in winter

आंघोळीपूर्वी गरम तेलाने शरीराला मसाज केल्याने आंघोळीदरम्यान वाहून जाणारे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. हाडे मजबूत होतात. रक्त परिसंचरण चांगले होते. वृद्धत्वाची चिन्हे दिसत नाहीत.
बदलत्या काळानुसार आजकाल स्नेहनासाठी बाजारात अनेक तेल उपलब्ध आहेत. पण, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. आजही भारतात बहुतेक घरांमध्ये या तेलाने मालिश केली जाते. हे तेल हाडे, स्नायू आणि केसांसाठी फायदेशीर आहे. त्याचवेळी, त्वचेवर चमक आणण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह आणि खोबरेल तेलाची मालिश करू शकता.तसेच आयुर्वेदिक तेलं वैद्यांच्या सल्ल्यानुसार वापरू शकता.

ML/KA/PGB
23 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *