हे २५ पक्ष सहभागी होणार नवीन संसद भवन उद्घाटन कार्यक्रमात
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून वाढत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 25 पक्षांनी सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. हे सर्व 25 पक्ष संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. यापैकी 7 पक्ष सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग नाहीत. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. आतापर्यंत 21 विरोधी पक्षांनी या समारंभाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.
28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी सर्व राजकीय पक्षांना आमंत्रित करण्यात आले असून ते त्यांच्या विवेकबुद्धीनुसार निर्णय घेतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान संसद भवनाच्या बांधकामात योगदान देणाऱ्या ६०,००० मजुरांचा (श्रमयोगी) सन्मान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
संसदेच्या उद्घाटनात या पक्षांचा सहभाग असेल (एनडीएमधील)
भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), नॅशनल पीपल्स पार्टी, मेघालय राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, सिक्कीम क्रांती मोर्चा, जन नायक पक्ष, AIDMK,IMKMK,AJSU,आरपीआय,मिझो नॅशनल फ्रंट,तमिम मनिला काँग्रेस,ITFT (त्रिपुरा),बोडो पीपल्स पार्टी,पीएमके,महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
आपना दल, आसाम गण परिषद
उद्घाटनात सहभागही होणारे बिगर एनडीए पक्ष
लोक जनशक्ती पार्टी (पासवान), बिजू जनता दल, बहुजन समाज पक्ष, तेलुगु देसम पार्टी, अकाली दल, जेडीएस