पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी होणार नाही

नवी दिल्ली, दि. १ : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीसाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एनके सिंह यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला फटकारले आणि म्हटले की अशा याचिकांमुळे सुरक्षा दलांचे मनोबल कमी होते.
काश्मीरमधील रहिवासी मोहम्मद जुनैद यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांमध्ये फतेश कुमार साहू आणि विक्की कुमार यांची नावेही समाविष्ट आहेत. केंद्र आणि जम्मू-काश्मीर सरकारने काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, असेही याचिकेत म्हटले आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, अशा जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदारीने वागा. देशाप्रती तुमचेही काही कर्तव्य आहे. तुम्ही एका निवृत्त न्यायाधीशाला चौकशी करायला सांगत आहात. आम्ही कधीपासून तपास तज्ञ झालो? आमचे काम फक्त निकाल देणे आहे.