Pan Card मध्ये बदल होणार, असे असेल सरकारने मंजूर केलेले पॅन २.०

पॅन कार्ड अपग्रेड करण्यासाठी पॅन २.० प्रोजेक्टला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. पॅन कार्ड आता क्यूआर कोडसह देण्यात येणार आहे. सध्याच्या पॅनकार्डधारकांना काहीही बदलण्याची किंवा नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नव्या प्रकल्पाची माहिती सोमवारी संसदेत दिली. PAN 2.0 प्रकल्पावर 1435 कोटी रुपये खर्च केले जातील.
पॅन 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत आता नवं बारकोड असलेलं पॅनकार्ड मिळणार आहे. मात्र, तुमचा पॅन नंबर बदलणार नाही. पण, तुम्हाला अपग्रेडेड प्रक्रियेतून जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला नवं पॅन कार्ड मिळेल. अपडेटेड पॅन कार्ड नव्या फिचर्ससह येणार आहे. यामध्ये QR कोड समाविष्ट असेल. अपग्रेडेट पॅन कार्ड विनामूल्य असणार आहे. अपडेटची प्रक्रिया पेपरलेस आणि ऑनलाईन असणार आहे.