१५ मार्च पासून विठ्ठलाच्या दर्शनात होणार बदल

सोलापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फारशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुढील तीन महिने विठ्ठलाचे दररोज ५ तास मुखदर्शन सुरू असणार आहे. तसेच विट्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे.
मंदिरातील आणि खास करून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी १५ मार्च पासून पुढील काळात हे काम सुरू असणार आहे.
साधारण ४५ दिवसाचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ५ जून पर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता भाविकांना ३० फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे. तर पुढील ४५ दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही. यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन मिळणार आहे.
ML/ML/SL
12 March 2024