अमिताभ बच्चन सोबत काम करताना कधी भीती वाटली नाही

 अमिताभ बच्चन सोबत काम करताना कधी भीती वाटली नाही

मुंबई दि.12 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : मराठीतील दिग्गज अभिनेत्यासोबत काम केले असल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करताना भीती वाटली नाही. असे उद्गार सी आय डी फेम सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ” वार्तालाप “‘ या कार्यक्रमाच्या वेळी काढले.

भायखळा येथील चाळीतील बाल नाटकातून सुरू झालेला प्रवास, एक शून्य शून्य मराठी गुन्हे मालिका ते आज अनेक चित्रपट , टी व्ही मालिका या सर्व आठवणींना उजाळा देत आज वयाच्या ७४ वर्षाच्या प्रवासातील घटनाक्रम त्यांनी सांगितला.

लवचिक काठीच्या तलवारीला नारळाच्या करवंटीची मूठ तयार करून शुर शिवाजी पत्राचा अभियान ते सी आय डी पर्यंत बंदुकीची गोळी व त्याचा शोध या सर्व पार्श्वभूमीवर बदललेले तंत्रज्ञान त्यांनी सांगितले.

अभिनेता ते नेता अशी संधी आली तर ? या थेट प्रश्नाला उत्तर देताना साटम म्हणाले, नाही आता आहे ते ठिक आहे. नको ते राजकारण असे सांगत ” नेता” मी अभिनय करत चित्रपटात साकारला आहे … तेवढे पुरे. असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई दूरदर्शन वर प्रथम मला कॅमेरा पाहता आला. एक शून्य शून्य या गुन्हे मालिकेने जो अनुभव दिला तो सी आय डी साठी मोलाचा ठरला.अभिनयाची कारकीर्द आनंदाने पार पाडली व आनंदाने पार पाडणार. मागे न पाहता पुढे पाहत राहत हसत खेळत सर्वांनी राहिले पाहिजे.तरच जीवनाचा आनंद घेता येतो.असे सांगत दिग्दर्शक हा चित्रकार असतो कलाकार त्यातील एक रंग असतो त्याला आनंद झाला की मला आनंद होतो. असे अनेक किस्से त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे म्हणाले, शिवाजी साटम यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांच्या अभियानाचे कौतुक जगभर होत असते. एकदा ट्रॅफिक पोलिसांनी माझी कार आडवली होती.पोलिसांनी त्यांना सलाम ठोकला.असे अनेक किस्से त्यांनी सांगितले.

कार्यवाह संदीप चव्हाण यांनी शिवाजी साटम यांच्या सी आय डी मालिकेतील भूमिके बद्दल भर भरून कौतुक केले. त्यांच्या या मालिकेमुळे कोणी गुन्हेगारी कडे वळले असे झाले नाही. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ML/ML/SL

12 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *