मुकणे तलावात झाली ढगफुटी …

नाशिक, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरण शिवारात काल विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी सांजेगाव ते कावनई या दोन गावांच्यामध्ये ढगफुटी सदृश पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे येथे चक्रीवादळ सारखी वावटळ धरणात फिरताना आढळून आले. यातून धरणाचे पाणी आकाशात उडत होते. ही सर्व दृश्य येथील एका स्थानिक गावकऱ्याने आपल्या मोबाईल मध्ये कैद केली आहेत. There was a cloudburst in Mukne Lake…
ML/KA/PGB
1 Oct 2023