लव जिहाद विरोधात कायदा होणे आवश्यक

 लव जिहाद विरोधात कायदा होणे आवश्यक

चंद्रपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ सध्या राज्य दौऱ्यावर आहेत.  चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा आवश्यक असल्याचे सांगितले.There should be a law against love jihad

भाजप महिला मोर्चा च्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ picture tiger यांनी लव्ह जिहाद विरोधातील कायद्याचं समर्थन केले. शिंदे-फडणवीस यांनी उत्तरप्रदेश च्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यात मुलींना फूस लावून पळवून नेणे, धर्मांतर करणे आणि लग्न लावणे हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सरकारने यावर लगाम लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर चित्रा वाघ picture tiger यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे . याआधी देखील अपशब्द वापरलेल्या महिलांनी अनेक पक्षात प्रवेश घेतले आहे आणि आज त्यापक्षाच्या नेत्या म्हणून काम करताहेत, त्यामुळे एकत्रित पणे त्या देखील सरकारचे कामं लोकांपर्यंत पोचविण्यासाठी काम करतील अशी माझी अपेक्षा आहे. कोणी कोणत्या पक्षात जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे वाघ म्हणाल्या.

ML/KA/PGB
13 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *