मोदी आहे तोवर धर्मावर आधारित आरक्षण नाहीच
सातारा, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जो पर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत धर्मावर आधारित आरक्षण देणार नाही अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराड येथील सभेत केली. लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या प्रचारार्थ कराड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं, यावेळी श्रीरामचंद्राची मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारानुसार देशांमध्ये नियोजनबद्ध विकास होत असून खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशांमध्ये कायापालट झालेला आहे. नमामि गंगे प्रमाणेच सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी जय जय कृष्णे योजना राबविण्याची ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली. देशामध्ये विकासाचे पर्व सुरू असताना काँग्रेसचे राष्ट्रवादी आणि विरोधक आरोपाचे केवळ राजकारण करीत आहेत अशी टीका आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. सातारा जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये आयटी पार्क एग्रीकल्चर इंडस्ट्रीज आणि रोजगार निर्मिती वरती भर देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केलं.रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन सन २०२३ साली घेतले, तेव्हा पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांने देशात सरकार काम करत आहे.संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर बनत असून नवीन हत्यारे निर्माण होत आहे.
देशामध्ये सैनिकांसाठी वन पेन्शन वन रँक योजना भाजप सरकारच्या काळात राबविण्यात आलेली आहे.भारतीय सैन्य दलात सातारा जिल्ह्यातील युवक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे निश्चितच सातारा जिल्ह्यातील नागरिकांना वाटत आहे. जम्मू काश्मीर मध्ये 370 वे कलम हटवून खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानानुसार भारत देशामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठ्या प्रमाणामध्ये देश वापर करीत आहे काँग्रेस पक्ष आर्टिफिशल इंटेलिजन्स चा वापर करून भाजप कार्यकर्त्यांचे बनावट व्हिडिओ सोशल मीडिया वरती टाकत आहे ,त्या विरोधात देशभरातील भाजप कार्यकर्त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करावे. तसेच निवडणूक आयोगाने देखील अशा फेक व्हिडिओची दखल घेऊन काँग्रेस पक्षावर कारवाई करावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केली.
काँग्रेस पक्ष धर्मावर आधारित आरक्षण देण्याची भाषा करत आहे मात्र जोपर्यंत मोदी जिवंत आहे आणि जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत या देशांमध्ये कधीही धर्मावर आधारित आरक्षण लागू होणार नाही ही मोदीची गॅरंटी आहे अशी अभिवचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील कराड येथे जाहीर सभेत दिले. देशातील जनतेच्या हितासाठी 24 बाय सात प्रमाणे २०४७ पर्यंत भाजप सरकार काम करेल असाही दावा त्यांनी केला.
ML/ML/SL
29 April 2024