महापुरुषांचा अवमान करणाऱ्या कोणालाही माफी नाही

 महापुरुषांचा अवमान करणाऱ्या कोणालाही माफी नाही

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  थोर राष्ट्र पुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये करण्याचा अधिकार कोणालाच नाही, ती व्यक्ती कोणीही असली तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली , मात्र विरोधक यावर समाधानी झाले नाहीत.

महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे, त्यांच्या आवाजाचा नमुना घेतला जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही आज सभागृहात दिली There is no pardon for anyone who disrespects the great men.

भिडे गुरुजी हिंदुत्व आणि शिव छत्रपती यांच्या कार्याला बहुजन समाजाला जोडण्याचं काम करतात मात्र कोणालाही राष्ट्रपुरुषां बद्दल आक्षेपार्ह बोलता येणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच जाईल , त्यासोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल देखील आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या काँग्रेसच्या शिदोरी या मासिकावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं. या वेळी विरोधक दोन्ही सभागृहात आक्रमक झाले होते. सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची देखील झाली.

भिडे गुरुजी यांच्या वक्तव्यावर स्थगन प्रस्ताव देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केला , यावर गेल्या शुक्रवारी आपण असाच प्रस्ताव आणला होता,आता पुन्हा तो आणला आहे त्यामुळे तो आपण नाकारल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं , यावर विरोधक संतप्त झाले.विधानपरिषदेत विरोधक आक्रमक झाले त्यामुळे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले होते.

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना आलेल्या धमक्यांचा उल्लेख त्या दोघांनी विधानसभेत केला , यशोमती ठाकूर यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल आणि ती धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मात्र यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

ML/KA/PGB
2 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *