मोदींकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर नाहीच
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून ई डी, सीबीआय आदी कोणत्याही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत नाही असे ठाम मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे, यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते ती पहावी लागेल.
ज्यांच्यावर या यंत्रणा सध्या कारवाई करीत आहेत त्यांनी तशी कामे केलेलीच आहेत , त्यामुळे त्याचे परिणाम त्यांनी भोगावे असे आंबेडकर म्हणाले. मोदी यांच्या जागी मी असतो तर मीही हेच केले असते असेही ते म्हणाले.
आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने नुकतीच शिवसेना ठाकरे गटाशी युती केली असून काल शरद पवारांना लक्ष करणारे आणि आज हे विधान करून उध्दव ठाकरे यांच्या सह महा विकास आघाडीला चांगलेच अडचणीत आणले आहे. मोदींकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप उध्दव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने होत असतो .
एका बाजूला आघाडीवर होत असलेली टीका , दुसऱ्या बाजूला मोदींना दिलेली ही क्लीन चीट या कात्रीत आता उध्दव ठाकरे सापडले असून वंचित सोबत त्यांचे कसे आणि किती जमेल यावरच यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ML/KA/SL
27 Jan. 2023