पंढरपूर कॉरिडॉर मध्ये कोणावरही अन्याय नाही
नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा आणि देशाचा दृष्टीने पंढरपूर कॉरिडॉर हा महत्वाचा असून हा प्रकल्प पुढे नेत असतांना कोणत्याही परिस्थितीत कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री एमनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले .
लाखो भाविकांचा दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा असून सगळ्यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री यांनी केले.
वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून पंढरपूर येथे भाविकांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत, सगळ्यांना विश्वासात घेउन , योग्य मोबदला देउन हा विकास आराखडा तयार केला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच विमानतळाची आवश्यकता भासल्यास याबाबत सकारात्मक विचार करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/SL
27 Dec. 2022