उपसभापतींच्या बाबत कोणताही घटनात्मक पेच नाहीच..
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या विरोधात दाखल झालेली अपात्रतेची नोटीस हा घटनात्मक पेच नाही. संविधानातल्या तरतुदीनुसार , अपात्रतेच्या नोटिसीचा कोणताही परिणाम त्यांच्या उपसभापती पदावर असण्यावर होऊ शकत नाही, त्या उपसभापती म्हणून काम करू शकतात , सगळे अधिकार उपसभापती म्हणून नीलम गोर्हे यांना आहेत असं उपमुख्यमंत्री आणि सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं. There is no constitutional problem regarding the Deputy Speaker.
फडणवीस यांनी आज या संदर्भात कायदेशीर बाजू मांडत भूमिका स्पष्ट केली. सदस्य म्हणून अपात्र ठरवणे आणि उपसभापतीपदावरून दूर करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अपात्र ठरवणे हे सभागृहाच्या अखत्यारीत येत नाही. अपात्रतेच्या प्रक्रियेचा कोणताही परिणाम सभागृहाच्या कामकाजावर होत नाही . संविधानाच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सभापती किंवा उपसभापतींनी त्यांच्या राजकीय पक्षाचा राजीनामा देणं, किंवा पक्षाचं सदस्यत्व घेणं यासंदर्भात सूट देण्यात आली आहे. अन्य सदस्यांचे अधिकार हे सभापती किंवा उपसभापतींना लागू नाहीत असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
डॉ. नीलम गोर्हे यांनी मुळात पक्षांतरच केलेलं नाही, विधीमंडळाच्या सदस्य होताना त्या ज्या पक्षात होत्या त्याच पक्षात त्या आहेत केवळ त्या पक्षाचं नेतृत्व बदललेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी केलेल्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधात अपात्रतेची नोटीस दिल्यामुळे गोर्हे यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांनी पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य नाही त्यांनी पदावरून पायउतार व्हावं अशी मागणी विरोधकांनी केली होती , यावेळी दोन्ही बाजूंची मतं ऐकून घेतल्यानंतर फडणवीस यांनी याबद्दल सविस्तर उत्तर दिलं.
ML/KA/PGB
18 July 2023