उमेदवारीचा पत्ता नाही , प्रचाराला मात्र सुरूवात
नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा सांगणारे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आज पासून प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारी निश्चित नसतानाही त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रंगपंचमीचे औचित्य साधून हनुमानाच्या मंदिरात पूजा विधी करत प्रचाराचे नारळ फोडले. रंगांची उधळण करत हेमंत गोडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि हेमंत गोडसे समर्थकांकडून प्रचाराला करण्यात आली. खासदार हेमंत गोडसें यांनी आज नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन करून रंगाची उधळण केली आहे.
आता हेमंत गोडसे यांनी परस्पर प्रचाराला सुरुवात केल्याने काही प्रश्न निर्माण होतायत. हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्र्यांकडून नाशिकच्या जागेचा ग्रीन सिग्नल मिळालाय का? की, हेमंत गोडसे शक्तिप्रदर्शन करुन बंडाचे संकेत देत आहेत का? महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी गोडसे मुंबईत तळ ठोकून होते. मुख्यमंत्र्यांच्या निवस्थानाच्या बाहेर दोन वेळेला गोडसेंनी शक्तिप्रदर्शन केलय. मंत्री छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार असणार अशी चर्चा सुरू झाल्यानं शिवसैनिकांसह गोडसे अस्वस्थ आहेत.
ML/ML/SL
30 March 2024