आपल्यासह कुटुंबियांना अडचणीत आणण्याचा राजकीय प्रयत्न होतोय…
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपली पत्नी अमृता फडणवीस हिच्याशी मैत्री करून , तिचा विश्वास संपादन करून आपल्यासह संपूर्ण कुटुंबियांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्ती करीत असल्याचा गंभीर आरोप आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली होती ,हा नेमका काय प्रकार आहे अशी विचारणा त्यांनी केली होती.There is a political attempt to put our families in trouble…
ही बाब उपस्थित केल्याबद्दल पवार यांचे आभार मानत फडणवीस यांनी सभागृहात विस्तृत माहिती दिली. अनिल जयसिंघानी ही व्यक्ती गेली चार ते पाच वर्षांपासून फरार आहे, त्यांच्या मुलीने अमृता हिला भेटणं सुरू केलं होतं, आपण फॅशन डिझायनर आहोत तसेच त्यासोबत इतर गोष्टी सांगून तिने अमृता यांचा विश्वास संपादन केला, त्यानंतर वडिलांना मदत करण्याची मदत करण्याची विनंती केली. बुकिंकडून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू अशी ऑफर दिली.
वडिलांना मदत करण्यासाठी एक कोटीची नवीन ऑफर दिली. दागिने आणि पैसे देण्याचीही ऑफर देत धमकीही दिली , त्यावर अमृताने आपल्याला काही फोन संभाषण , व्हिडिओ आपल्याला दाखवल्या नंतर आपण गुन्हा दाखल केला. या तपासात काही पोलिस अधिकारी, नेत्यांची ही नावे तिने घेतली आहेत.
मागच्या पोलीस आयुक्तांनी तिच्या वडिलांना सोडण्याची तयारी सुरू केली होती, तुम्ही आता मदत करा अन्यथा तुम्हाला अडकवू अशी धमकी तिने दिली , हा गुन्हा दाखल केल्यापासून जयसिंघानी ला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यात यश आलं नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
या संपूर्ण प्रकरणात अनेक नावे समोर येत आहेत, मला आणि माझ्या कुटुंबीयांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता असे स्पष्ट दिसून येत आहे, राजकारणात लोक कोणत्या स्तरावर गेले आहेत असा सवाल फडणवीस यांनी केला, मात्र या प्रकरणी योग्य चौकशी केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
ML/KA/PGB
16 Mar. 2023