मुंबई मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या भरतीसंख्येत दहा वर्षांत घट झाली आहे.
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या दहा वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत भरती होणाऱ्या विद्याथ्यांच्या प्रमाणात घट झाल्याची माहिती प्रजा फाऊंडेशने दिली . There has been a decline in the number of students enrolled in Mumbai municipal schools in ten years.प्रजा फाऊंडेशनतर्फे ‘मुंबई महानगरपालिका शाळांतील शिक्षणाची सद्यस्थिती, 2022’ या अहवालाचे प्रकाशन आज प्रेस क्लब येथे करण्यात आले.
मुंबईतील संपूर्ण शाळांमध्ये दाखल होणाऱ्या एकूण विद्याथ्र्यांपैकी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत भरती होणाऱ्या विद्याथ्यांचे प्रमाण 2012-13 वर्षात 45% हुन कमी होऊन 2018-19 मध्ये 36% झाले. पुन्हा 2021-22 मध्ये वाढून 42% झाले. 2012-13 ते 2018-19 या दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या शाळांत भरती होणाऱ्या विद्यायांचे प्रमाण 4,34,523
वरून 3,00,746 झाले, म्हणजेच जवळपास 31% ने घटले,तर 2018-19 ते 2021-22 दरम्यान विद्यार्थीसंख्या
3,00,746 वरून 3,18,002 वर गेली, म्हणजे त्यात 6% ने वाढ झाली अशी माहिती प्रजाने दिली. मुंबई महानगरपालिकेने विविध इयत्तामध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पाहून अवश्यक पायाभूत सुविधा आणि संसाधनांची तजवीज केली पाहिजे. उदाहरणार्थ, मुंबई पब्लिक स्कूल (एमपीएस) मध्ये पूर्वप्राथमिक ते इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग असल्याने 2014-15 ते 2021-22 दरम्यान विद्यार्थीसंख्येत 92% ने वाढ झाली. म्हणजेच पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मुंबई मनपाकडे आहे. या शाळांतील गुणवत्ता सुधारण्याची ही संधी मुंबई मनपाने सोडता कामा नये,” असे मत प्रजा चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी मांडले.There has been a decline in the number of students enrolled in Mumbai municipal schools in ten years.
“कोविडकाळात सर्वांनाच आरोग्याची काळजी होती. पण 2020-21 दरम्यान मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीच झाली नाही. ज्या वर्षात आरोग्य तपासणी झाली तेव्हा सर्व विध्यार्थची झाली नाही. 2015-16 मध्ये केवल 49% (3.33,485 पैकी 1,89,809 जण) विद्यार्थ्यांची तपासणी झाली आणि 2021-22 मध्ये तर त्याहून कमी, केवळ 26% विद्यार्थ्यांची तपासणी झाली. ती माहिती फाउंडेशनच्या संवाद कार्यक्रमाचे प्रमुख योगेश मिश्रा यांनी दिली. शिक्षण हक्क कायदानुसार विद्यार्थी शिक्षक हे प्रमाण 30.1 असे असले पाहिजे. 2021-22 मध्ये मुंबईच्या इंग्रजी माध्यमाच्या 41:1 होते. या त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई मनपाने परिणाम आधारित आखणी करणे जरूरीचे आहे. मुंबई महानगरपालिकेकडे पुरेसा निधी आहे मात्र शिक्षणाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज आहे.असे मत मिश्रा यांनी व्यक्त केले.
मुंबई मनपाच्या शिक्षणाच्या अर्थसंकल्प तरतुदीत वर्ष 2012-13 ते 2022-23 दरम्यान (रु. 2.135 कोटी ते 3,248 कोटी) 52% ने वाढ झाली .तसेच आर्थिक वर्षात 2012-13 मध्ये मुंबई महानरपालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजात प्रति विद्यार्थी 49.126 ची तरतूद होती जी असर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मी 108% ने वाढून रू. 1,02,143 झाली आहे .मुंबई मनपाचे हे प्रति विद्यार्थी बजेट जवळपास मुंबईतल्या नावाजलेल्या शाळांमधील वार्षिक शुल्का इतकेच आहे ,असे मिलींद मस्के म्हणाले.
ML/KA/PGB
5 Dec .2022