गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार ‘द रेस’ अनधिकृत डान्स बारवर कारवाई

 गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार ‘द रेस’ अनधिकृत डान्स बारवर कारवाई

नवी मुंबई दि २८ :– नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर काल रात्री पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली.
ही कारवाई राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्पष्ट निर्देशानुसार आणि तत्परतेने पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आली.

सदर बार परवानगीशिवाय रात्री १२ नंतर सुरू होता. पोलिसांनी रेड केली असता, म्युझिक सिस्टीमच्या कर्णकर्कश्श आवाजात काही महिला अत्यंत अश्लील पोशाखात ग्राहकांसमोर अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईदरम्यान, ४० महिलांची सुटका करण्यात आली. याशिवाय, ६ बार वेटर यांच्यासह एकूण ४६ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात बार मालक, व्यवस्थापक आणि इतर संबंधितांवर अनधिकृत व्यवसाय, अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणे तसेच महिलांच्या प्रतिष्ठेचा भंग करणारे वर्तन याबाबत विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई ही राज्य शासनाच्या अश्लीलतेवर कठोर प्रतिबंध घालण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. समाजातील नैतिक मूल्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पावले उचलण्यात येत आहेत.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि प्रभावी कार्यपद्धतीमुळे अशा बेकायदेशीर व अनैतिक कृत्यांवर आळा बसण्यास निश्चितच मदत होणार आहे. राज्य सरकारने हाती घेतलेली ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार आहे. ML.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *