आंदोलक तरुणाने लेकीचे नाव ठेवले ‘आरक्षणा’

 आंदोलक तरुणाने लेकीचे नाव ठेवले ‘आरक्षणा’

नांदेड, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यभरात आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण पेटले आहे. मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर विविध मार्गांनी आंदोलन करण्यात येत आहे. सरकारला हादरवून टाकणाऱ्या या आंदोलनात सहभागी झालेल्या शेलगाव (जिल्हा नांदेड) येथील तरुण आतम राजेगोरे यांनी आपल्या नवजात लेकीचे नाव ‘आरक्षणा’ असे ठेवले आहे.

शेलगाव हे शेतकरी चळवळीसाठी जिल्ह्यात ओळखले जाते.या गावातील नागरिक, तरुण, शेतकरी कामगार या आरक्षणाच्या लढाईंत सहभागी झाले आहेत.शेलगाव येथील आतम राजेगोरे हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केल्या काही वर्षांपासून चळवळीत सहभागी आहे.

मी गेल्या काही वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनात सहभागी झालो आहे. या आंदोलनांची आठवण राहावी यासाठी माझ्या मुलीचे नाव आरक्षणा असे ठेवले आहे. शासनाने मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी आतम राजेगोरे यांनी केली आहे.

SL/KA/SL

1 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *