कुस्तीपटू पदके विसर्जित न करताच माघारी
वाराणसी,दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जंतरमंतरवरून नव्या संसदेपुढील महापंचायतीला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुस्तीपटूंची रविवारी दिल्ली पोलिसांशी झटापट झाली. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक व संगीता फोगाट यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ आपली पदके गंगेत विसर्जित न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी समजूत काढल्यानंतर कुस्तीपटूंनी पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. या चर्चेनंतर टिकैत यांनी केंद्र सरकारला कारवाईसाठी 5 दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे.
टिकैत कुस्तीपट्टूकडून त्यांच्या पदकांची बॅगही घेतली आहे. ही बॅग ते राष्ट्रपतींना देणार असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे. सर्व खेळाडू हरिद्वारहून घरी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट सुमारे तासभर हरिद्वारमध्ये गंगा किनारी पदके धरून रडत बसले होते.
दरम्यान, गंगा समितिने कुस्तीपटूंना विरोध दर्शवत म्हटले होते की- ही पूजेची जागा आहे, राजकारणाची नव्हे.
साक्षी मलिकने म्हटले आहे की, ही पदके आम्ही पवित्रतेने मिळवली होती. ती परिधान करून पांढरपेशी व्यवस्था केवळ स्वतःचा प्रचार करते. त्यानंतर आमचे शोषण करते. राष्ट्रपती व पंतप्रधानांनी आमची काळजी केली नाही. त्यामुळे आम्ही ही पदके त्यांना परत करणार नाही. कुस्तीपटूंनी आता इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, बृजभूषण शरण सिंह यांनी 5 जून रोजी अयोध्येत मोठी रॅली बोलावली आहे. यात संत सहभागी होणार आहेत. पॉक्सो कायद्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे बृजभूषण आणि संतांचे म्हणणे आहे.
SL/KA/SL
30 May 2023