जगातील सर्वात स्मार्ट चॅटबॉट लॉंच

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Chat GPT आल्यानंतर विविध कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तीच प्रणाली निर्माण करणे सुरू केले. गुगलने जेमिनी तर चीनने डीपसीक आणले आहे. त्यानंतर आता अमेरिकेतील मोठे उद्योगपती एलन मस्क यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप एक्स एआयने ‘ग्रोक ३’ हा नवीन एआय चॅटबॉट लाँच केला आहे, जो थेट चिनी डीपसीक आणि चॅटजीपीटीशी स्पर्धा करणार आहे.
या AI मॉडेलमध्ये कोडिंगपासून लाईव्ह गेम्स तयार करण्यापर्यंत विविध कार्य करता येतील. एक्सच्या प्रीमियम प्लस प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांना हे उपलब्ध असेल. या प्लॅनची किंमत प्रति महिना १ हजार ५२५ आणि वार्षिक १८ हजार ३०० रुपये आहे. याबाबत मस्क यांनी सांगितले की, हे एआय मॉडेल दोन लाख जीपीयूच्या मदतीने ट्रेन करण्यात आले आहे, त्यामुळे ते जगातील सर्वात स्मार्ट एआय असेल.
SL/ML/SL 19 Feb. 2025