अयोध्येतील श्रीराम मंदीरासाठी तयार होत आहे जगातली सर्वात मोठी अगरबत्ती

वडोदरा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाला आता काहीच दिवसांचा अवधी आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे. रामलल्लाच्या सेवेसाठी देशातील विविध भागांत विविध वस्तूंची निर्मिती होत आहे. गुजरातमधील वडोदरा येथील रामभक्तांनी रामलल्लाला अर्पण करण्यासाठी जगातील सर्वात मोठी अगरबत्ती तयार केली आहे.
अगरबत्ती बनवण्यासाठी त्यांना सुमारे ३ ते ४ महिने इतका कालावधी लागला. या अगरबत्तीचे वजन ३५०० किलो आहे. अगरबत्तीची लांबी 108 फूट तर रुंदी साडे तीन फुट आहे. गुजरात येथील वडोदरा येथील कारागिरांनी ही प्रचंड अशी भली मोठी अगरबत्ती बनविली आहे. ही अगरबत्ती बनवण्यासाठी त्यांना सुमारे ३ ते ४ महिने इतका कालावधी लागला. या अगरबत्तीचे वजन ३५०० किलो आहे. अगरबत्तीची लांबी 108 फूट तर रुंदी साडे तीन फुट आहे. जगातील ही सर्वात मोठी अगरबत्ती आहे. ही अगरबत्ती रामलल्लाच्या चरणी अर्पण करणार आहे अशी माहिती कारागिरांनी दिली.
ही अगरबत्ती ४५ दिवस जळते. तसेच, त्याचा सुगंध 15 ते 20 किलोमीटर परिसरात पसरेल. त्यामुळे अयोध्येपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राम भक्तांनाही या अगरबत्तीचा सुगंध घेता येणार आहे. थोडक्यात राम मंदिराचा परिसर या अगरबत्तीने सुगंधित होणार आहे.
वडोदर येथे या अगरबत्ती बनविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. अगरबत्ती तयार करण्यासाठी गायीचे शुद्ध तूप वापरण्यात आले आहे. तसेच यात हवन साहित्याचा वापर करण्यात आला आहे. ही अगरबत्ती तयार करणाऱ्या गुजरातमधील बिहा बाई या कारागिराने अयोध्येत भगवान श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यामुळे आम्ही ही अगरबत्ती बनविली आहे. यात अनेक सुगंधी घटक मिसळले आहेत. सुमारे तीन ते चार महिने आम्ही त्या अगरबत्तीवर मेहनत घेतली. ही अगरबत्ती रथातून अयोध्येला पाठवली जाईल अशी माहिती दिली.
SL/KA/SL
25 Dec. 2023