गुजरातमध्ये होणार जगातील सर्वांत मोठे Data Centre
जामनगर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काळाची पावले ओळखून विविध क्षेत्रांमध्ये उद्योगाचा विस्तार करणारे उद्योजक मुकेश अंबानी आता गुजरातमध्ये जगातील सर्वांत मोठे Data Centre उभारणार आहेत. मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी गुजरातच्या जामनगर येथे जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर तयार करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे अंबानी यांच्या रिलायन्सचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे. मुकेश अंबानी हे AI तंत्रज्ञानातील आघाडीची जागतिक कंपनी असलेल्या ‘एनव्हीडीया’ सेमीकंडक्टर कंपनी खरेदी करत असल्याचे सांगितले जाते, कारण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एनव्हीडीया आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांनी परिषदेतील मुलाखतीवेळी भारतात ‘एआय’ क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची संयुक्त घोषणा केला होती. एनव्हीडीयाने म्हटले आहे की, रिलायन्स तयार करत असलेल्या एक-गीगावॉट डेटा सेंटरसाठी ते ब्लॅकवेल एआय प्रोसेसर पुरवतिल, कारण कंपनीचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी शिखर परिषदेदरम्यान सांगितले की, “भारताने स्वतःचे एआय तयार केले पाहिजे.
भारतीय बाजारपेठेच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेबद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले,“आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगामध्ये समृद्धी आणि समानता आणू शकतो. अमेरिका आणि चीन व्यतिरिक्त, भारतामध्ये सर्वोत्तम डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधा आहेत. दरम्यान, भारत सरकारने स्टार्टअप, एआय प्रकल्प व एलएलएमच्या विकासासाठी १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुक करण्याचे आश्वासन दिले होते. भारतात चीप बनवणारा उद्योग पहिल्या टप्प्यावर आहे.
SL/ML/SL
25 Jan. 2025