अणुस्कुरा घाटात पडलेली दरड हटविण्याचे काम सुरू
रत्नागिरी, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे. काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठे दगड आणि माती रस्त्यावर आली. त्यामुळे सध्या 16 तासानंतरही वाहतूक ठप्प आहे. या ठिकाणी मोठा दगड आहे, तो हटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
या मार्गावरून पुणे, कोल्हापूर,मलकापूर, कराड अशी नेहमी वाहतूक होत असते. त्यामुळे कोकणाशी संपर्क तुटला असून या मार्गावरून होणारी वाहतूक आंबा पाली मार्गावरून वळविण्यात आली आहे.
ML/ML/SL
14 June 2024