संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. संसदेच्या 19 दिवसांच्या या अधिवेशनात 15 बैठका होणार असून 37 विधेयके मांडली जाणार आहेत. IPC, CrPC आणि एविडेंस अॅक्ट यात बदल करणारी तीन विधेयक अधिवेशनात पारीत होण्याची शक्यता देखील आहे. पावसाळी अधिवेशनावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी ती लोकसभेत मांडत स्टॅडींग कमिटीकडे पाठवली होती. अनेक मिटिंग नंतर 10 नोव्हेंबरला कमिटीने आपला रिपोर्ट सादर केला होता.
या सोबतच मुख्य निवडणुक आयुक्त आणि बाकी निवडणुक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात देखील विधेयक मांडले जाणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची अधिवेशनातील रणणीती बाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात बैठक होणार आहे.
दरम्यान हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. पराभवानंतर निराश होऊ नका. संसदेत त्याचा राग काढू नका. हा पराभव सुर्वणसंधी समजा. सकारात्मक होऊन बदल करा…असे सल्ले मोदी यांनी दिले.
SL/KA/SL
4 Dec. 2023