हे आहेत रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाच्या वर्षीचा रसायनशास्त्रातील (Chemistry) नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अकादमीने केलेल्या घोषणेनुसार, माँगी जी. बॉएंडी (Moungi G. Bawendi), लुईस ई. ब्रुस (Louis E. Brus) आणि अॅलेक्सी आय. एकिमोव्ह (Alexei I. Ekimov ) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. क्वांटम डॉट्सच्या संशोधनासाठी आणि संश्लेषणासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मोउंगी जी. बावेंडी हे अमेरिकेतील केंब्रिज येथे असणाऱ्या एमआयटी मध्ये प्रोफेसर आहेत. लुईस ब्रुस हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर अॅलेक्सी आय. एकिमोव्ह हे न्यूयॉर्कमधील नॅनोक्रिस्टल्स टेक्नॉलॉजी इनकॉर्पोरेटेड या संस्थेत कार्यरत आहेत.
या तिघांनी क्वांटम डॉट्सचा शोध लावला. हे अगदी छोटे नॅनोपार्टिकल असतात. हे एवढे छोटे असतात, की त्यांच्या आकारावरुन त्यांचे गुणधर्म ठरतात. या शोधाचा टेक्नॉलॉजी ते मेडिकल अशा सर्व क्षेत्रांमध्ये मोठा फायदा होणार आहे.
मानवतेसाठी मोलाचं कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी नोबेल पुरस्कारांनी गौरविण्यात येतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र आणि शांतता यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाइटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
SL/KA/SL
4 Oct. 2023