हे आहेत यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे मानकरी
नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रीडा मंत्रालयाने काल यावर्षीच्या अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार या देशाच्या प्रतिष्ठीत क्रीडा पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे जाहीर केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ३० नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनात खास कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमुळे या पुरस्कारांची घोषणा यावर्षी थोडी विलंबाने झाली आहे. यावर्षी 25 खेळाडू अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांची नावे आणि क्रीडाप्रकार पुढील प्रमाणे.
अर्जुन पुरस्काराचे मानकरी
सीमा पुनिया (अॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अॅथलेटिक्स), अविनाश साबळे (अॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित पंघाल (बॉक्सिंग), निकहत झरीन (बॉक्सिंग), भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशिला देवी (ज्युडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बोल्स), सागर ओव्हाळकर (मल्लखांब), इलावेनिल वलारीवन (नेमबाजी), ओमप्रकाश मिथरवाल (नेमबाजी), श्रीजा अकुला
(टेबल टेनिस), विकास ठाकूर (वेटलिफ्टिंग), अंशू मलिक (कुस्ती), सरिता (कुस्ती), परवीन (वुशू), मानसी जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण ढिल्लॉन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्नील पाटील (पॅरा जलतरण), जर्लिन अनिका जे (कर्णबधिर बॅडमिंटन).
द्रोणाचार्य पुरस्काराचे मानकरी
जीवनज्योत सिंग तेजा (तिरंदाजी), मोहंमद अली कोमर (बॉक्सिंग), सुमा शिरुर (नेमबाजी), सुजीत मान (कुस्ती)
द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी
दिनेश लाड (क्रिकेट), बिमल घोष (फुटबॉल), राज सिंग (कुस्ती)
ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी
अश्विनी अकुंजी (अॅथलेटिक्स), धरमवीर सिंग (हॉकी), बी. सी. सुरेश (कबड्डी), नीर बहादूर गुरुंग (पॅरा अॅथलेटिक्स)
SL/KA/SL
15 Nov. 2022