VB G RAM G विधेयक आवाजी मतदानाने मंजूर
नवी दिल्ली, दि. 18 : भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) बिल म्हणजेच VB G RAM G विधेयक आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. त्याआधी, विरोधकांनी संसद संकुलात निषेध मोर्चा काढला. ५० हून अधिक विरोधी खासदारांनी निषेध मोर्चात भाग घेतला आणि व्हीबी-जी राम जी विधेयक मागे घेण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. चर्चेदरम्यान, विरोधकांनी विधेयकाविरुद्ध घोषणाबाजी केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये कागदपत्रे भिरकावली. गदारोळात हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, “मनरेगा मूळतः महात्मा गांधींच्या नावावर नव्हता. ते मूळतः नरेगा होते. नंतर, 2009 च्या निवडणुका आल्या तेव्हा निवडणुका आणि मतांसाठी महात्मा गांधींची आठवण आली. बापूंची आठवण आली. त्यानंतर त्यात महात्मा गांधींची भर पडली.”तत्पूर्वी, विधेयकाच्या निषेधार्थ विरोधकांनी संसद परिसरात मोर्चा काढला. 50 हून अधिक विरोधी खासदारांनी भाग घेतला आणि VB-G-RAM-G विधेयक मागे घेण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.
काल, लोकसभेत VB-G-RAM-G विधेयकावर 14 तास चर्चा झाली. कामकाज 1:35 वाजेपर्यंत चालले. 98 खासदारांनी भाग घेतला. विरोधकांनी प्रस्तावित कायदा स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली. तो 20 वर्षे जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल.
SL/ML/SL