कृषी प्रदर्शनात दोन वर्षाचा रेडा ठरला मोठे आकर्षण…

 कृषी प्रदर्शनात दोन वर्षाचा रेडा ठरला मोठे आकर्षण…

बुलडाणा, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर अभिता ऍग्रो एक्सपोच्या वतीने 12 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आल होते प्रदर्शनी मध्येच शेतकऱ्यांच्या पशुंचही पशुपक्षी प्रदर्शन आयोजित होते, यामध्ये ९०० किलो वजनाच्या दोन वर्षे वयाच्या रेड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले..

हा रेडा मुरा जातीचा आहे याला सकाळी 5 किलो ढेप अर्धा किलो गूळ 5 किलो सफरचंद आणि 5 लिटर दूध एका वेळेला दिले जाते. शिवाय दोन किलोमीटर याला फिरायला नेले जाते. दुपारी हिरवा चारा आणि संध्याकाळी कोरडा चारा तसेच रात्री झोपताना दोन किलो गव्हाचा उंडा याला खायला दिले जाते. दोन वर्षाचा हा रेडा एकदम गुटगुटीत दिसत असून याची विक्री किंमत 11 लाख रुपये कृष्णा धोंडगे या रेड्याचा मालक असणाऱ्या युवा शेतकऱ्याने ठेवली आहे.

SL/KA/SL

15 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *