अहिंसेच्या पुजाऱ्यांकडून एकमेकांना हिंसक मारहाण

 अहिंसेच्या पुजाऱ्यांकडून एकमेकांना हिंसक मारहाण

वाशिम, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दर्शन कुणी आणि कसे घ्यावे यावरून वाशिम जिल्ह्यातील शिरपूर मध्ये अहिंसेचे पुजारी जैन धर्माच्या दोन पंथीयांमध्ये तुफान हाणामारी झाली.

जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर इथं जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी श्वेतांबर आणि दिगंबर या दोन पंथियामध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

या मध्ये एक ७५ वर्षीय महिला आणि दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. त्यामुळे शिरपूर जैन येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून हे वातावरण शांत केलं आहे,मात्र आरोपीवर कारवाई तसेच परिसरात श्वेतांबर पंथाच्या वतीने जो मंडप टाकलं तो काढणार नाही तोपर्यंत मंदिर परिसरात उपोषण सुरू रहाणार असं दिगंबरी पंथाच्या वतीने सांगत आहेत.

ML/KA/SL

5 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *