मोनोरेलचा थरार अन् सव्वा तासानंतर १०० प्रवाशांची सुटका

 मोनोरेलचा थरार अन् सव्वा तासानंतर १०० प्रवाशांची सुटका

मुंबईत पावसाने हाहाकार माजवला आहे. रस्ते जलमय झाले आहेत. तर, रेल्वे सेवा देखील ठप्प झाली. त्यांनतर आता मोनो रेल देखील बंद पडली. भक्तीपार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान मोनो रेल बंद पडली 100 प्रवासी आत अडकले. एकजण बेशुद्ध पडला. घाबरलेल्या प्रवाशांनी मोनो रेलच्या काचा फोडल्या.

संध्याकाळी 6.15 च्या सुमारास चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान मोनो ट्रेन थांबवण्यात आली. मुसळधार पावसात मुंबईत एका मोनोरेल ट्रेनमध्ये बिघाड झाला. ज्यामुळे सुमारे 100 प्रवासी एका तासाहून अधिक काळ अडकून पडले. उंच ट्रॅकवरून चालणारा मोनोरेल रेक वीज पुरवठ्यातील किरकोळ समस्येमुळे मोनो रेल जागच्या जागी थांबल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चे ऑपरेशन आणि देखभाल घटनास्थळी. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सुरू करण्यापूर्वी घाबरलेले प्रवासी ट्रेनची खिडकी फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेक दृश्यांमध्ये दिसून आले.

मुंबईत भरपावसात मोनोत अडकलेल्या प्रवाशांसाठी फायरब्रिगेडचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. एका तासानंतर अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. शिडी लावून प्रवाशांना मोनो रेलमधून बाहरे काढण्यात आले. रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवा खोळंबली असल्याने मोनो रेलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली. प्रवाशांनी अतिशय भरगच्च अशी भरलेली मोनो रेल एका बाजूला झुकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अचानक तांत्रिक कारणास्तव ही मोनोरेल थांबली. ही मोनोरेल एका बाजूला झुकलेली आहे. मोनोरेलमध्ये शेकडो प्रवासी आहेत. तासाभरापासून आतमधील एसीदेखील बंद झाला. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होतोय. या भयानक परिस्थित आता अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आहे. या मोनोरेलचे दरवाजे बंद आहेत आणि एसी बंद आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास अडचणी आल्या. यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी मोनो रेलच्या काचा फोडल्या.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *