समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार!

 समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार!

वाशिम, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील कारंजा जवळ पुणेहुन चंद्रपूरला जाणारा मालवाहू ट्रकने डिव्हायडरला धडक मारून पेट घेतल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास कारंजा ते दोनद दरम्यान असलेल्या समृद्धी महामार्ग लोकेशन १६३ वर पुणेहून चंद्रपूरकडे जात असलेल्या मालवाहू ट्रकने डिव्हायडरला धडकून अचानक पेट घेतल्याने संपूर्ण ट्रकला आग लागली. The thrill of burning trucks on the Samriddhi highway!

ही आग इतकी भीषण होती की घटनास्थळावरील आकाशात आग आणि धुराचे लोळ पसरले होते.
दरम्यान, ट्रकचा समोरचा टायर फुटल्याने डिव्हायडरला घर्षण होऊन ईंधन टाकीला आग लागल्याने संपूर्ण ट्रकचे जळून नुकसान झाले. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून पेटलेल्या ट्रकमधून उडी घेत स्वतःचा जीव वाचवला.

ML/KA/PGB
28 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *