मार्क झुकरबर्गच्या घरी तिसर्यांदा हलणार पाळणा…
(एमएमसी न्यूज नेटवर्क) : फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हलणार असल्याची माहिती मार्क झुकरबर्ग याने नवीन वर्षाच्या निमित्ताने पत्नी प्रिसिला चॅनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत दिली आहे. 2023 हे वर्ष या जोडप्यासाठी खास आहे, कारण ते यावर्षात त्यांच्या घरी तिसऱ्या बाळाचे आगमन होणार आहे.
मार्क झुकरबर्गने इंस्टाग्रामवर गर्भवती पत्नीआणि मुलीचा फोटो शेअर करत ”Happy New Year! 2023 मध्ये येणारे सर्व ऍडव्हेंचर आणि प्रेम येथे आहे.” अशी कॅप्शन दिली आहे. यात झुकरबर्ग यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केलेला आहे.
झुकरबर्गने सप्टेंबर २०२२ मध्ये पत्नी प्रिस्किला चॅन गरोदर असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिलं होत की, , “खूप प्रेम. पुढील वर्षी मॅक्स आणि ऑगस्टला नवीन बहिण मिळणार आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे “.
या जोडप्याचं २०१२ मध्ये लग्न झाले आहे. डिसेंबर २०१५ मध्ये झुकरबर्ग यांनी त्यांची पहिली मुलगी मॅक्सिमा चॅन झुकरबर्ग हिच्या जन्माची माहिती दिली होती. ऑगस्ट २०१७ मध्ये या जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला. तिचे नाव ‘ऑगस्ट’ ठेवले आहे.
दरम्यान, चॅन ही झुकेरबर्गची कॉलेजपासून प्रेयसी आहे. चॅनने हार्वर्ड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आहे. २००३ मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी फ्रेट पार्टीमध्ये भेटल्यानंतर या जोडप्याने डेटिंग करण्यास सुरुवात केली. या जोडप्याने १९ मे २०१२ रोजी लग्न केलं. गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्या लग्नाचा १०वा वाढदिवस साजरा केला.
TM/KA/SL
2 Jan. 2023