भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या कार्यकाळात वाढ
नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप अध्यक्ष जे पी नड्डांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नड्डा यांना मुदतवाढ दिली गेल्याची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. भाजपच्या कार्यकारिणीत हा प्रस्ताव मंजूर झाल्याचेही शाहांनी सांगितले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला आणि सर्वांनी एकमताने मंजुरी दिली.
जे. पी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आल्यानंतर सर्वात मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे ते म्हणजे लोकसभा निवडणूक. कारण २०१४ मध्ये भाजपाला २८०+ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राजनाथ सिंह हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यानंतर २०१९ मध्ये अमित शाह हे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यावेळी भाजपाला ३०३ जागा मिळाल्या आणि प्रचंड बहुमत मिळालं. आता जे. पी. नड्डा भाजपाचं ४०० + जागांचं लक्ष्य पूर्ण करणार का हे पाहणं मह्त्तवाचं असणार आहे.
कमीत कमी प्रकाशझोतात राहून काम करणं हे जे. पी. नड्डा यांचं वैशिष्ट्य मानलं जातं. १९८६ पासून जे. पी. नड्डा हे राजकारणात सक्रिय झाले. वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली होती. जे. पी. नड्डा हे अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.
SL/KA/SL
17 Jan. 2023