या राज्यात तापमानाचा पारा ५४ अंशापार

 या राज्यात तापमानाचा पारा ५४ अंशापार

कोची, दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळीनंतर देशभरातील हवामान वाढण्यास सुरूवात होते. सध्या बहुतांश ठिकाणी 30 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असताना केरळमध्ये मात्र तापमानवाढीचा कहर झाला आहे. केरळच्या काही भागात विक्रमी 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेची महाभयंकर लाट बघता सामान्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले की राज्यातील काही भागात तापमान 54 अंश सेल्सिअसच्याही पुढे नोंदवण्यात आले. केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्याच्या दक्षिणेकडील अलापुझ्झा, कोट्टायम, कन्नूर जिल्ह्यांतील काही भागांत तापमान 54 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले. तिरुअनंतपुरम, कोल्लम, अलापुझ्झा, कोट्टायम, एर्नाकुलम, कोझिकोड आणि कन्नूरमध्ये गुरुवारी तापमान 45 ते 54 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवण्यात आले. या ठिकाणी दीर्घ काळ उष्णतेची लाट राहील असे प्राधिकरणाने म्हटले आहे.प्राधिकरणानुसार इतके तापमान अतिशय घातक आहे. यामुळे गंभीर आजार आणि हीट स्ट्रोकचा धोका अनेक पट वाढू शकतो.

कासरगोड, कोझिकोड, मलप्पुरम, कोल्लम, पठानमथिट्टा आणि एर्नाकुलममधील तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअशपर्यंत पोहोचले आहे. तर इडुक्की आणि वायनाडच्या डोंगराळ भागात तापमान 29 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आले आहे.

SL/KA/SL

10 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *