12 वीचा पेपर शिक्षकाने फोडला, या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले

 12 वीचा पेपर शिक्षकाने फोडला,  या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले

दादर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. झी २४ तासने सर्वप्रथम ही बातमी दिली होती. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर साखरखेर्डा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पाच आरोपींना अटक केली आहे. कलम 420, 120 बी, आणि विद्यापीठ कायद्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन शिक्षकांचा समावेश आहे. गोपाळ शिंगणे आणि गजानन अधे अशी या शिक्षकांची नावे असून अन्य तीन आसपासच्या गावातील तरुणांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले आहेत. याप्रकरणी शनिवारी दादर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शनिवारी गणिताच्या पेपरदरम्यान बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला शिवाजी पार्क पोलिसांनी कॉपी करताना पकडल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. अधिक तपास करून पोलिसांनी शिक्षकासह आणखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी दुपारी २.१० वाजता दादर येथील डॉ. एका विद्यार्थ्याने परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन आणल्यानंतर परीक्षा केंद्रप्रमुखांनी ही तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, एका वर्ग पर्यवेक्षकाने परीक्षा केंद्रप्रमुखांना फोन कक्षात आणल्याची माहिती दिली होती. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचा मोबाईल जवळ ठेवण्याची परवानगी नाही, परंतु तरीही विद्यार्थ्याने फोन जवळ ठेवला.The teacher cracked the 12th paper, the threads of this case reached Mumbai

ML/KA/PGB
5 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *