यंदा ५ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गतकाही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे हवालदिल झालेल्या आंबा उत्पादकांची यावर्षी चांगली कमाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार ५ हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट मार्केट समितीने ठेवले आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये निर्यात करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच कोकणातील उत्तम प्रतिचा आंबा यावेळी सर्वच बाजारात उपलब्ध होईल असेही कृषी पणन मंडळाने माहिती दिली.
कोकणात आंब्याचे उत्पादन वाढल्याने दरही काहीसे कमी असल्याचे सध्या बाजारात दिसून येत आहे. तसेच उत्तम प्रतिच्या आंब्याला परदेशात मागणी वाढली आहे. या वर्षी आंब्याचा हंगाम चांगला सुरू झाला असून, अनुकूल हवामानामुळे चांगले पीक येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. कोकण विभागातील उत्पादक विशेषतः उत्साही आहेत. मुळात कर्नाटकातून येणारे आंबे अद्यापही बाजारात उपलब्ध झाले नाहीत. ज्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या कोकणातील हापूस केसर या प्रमुख जाती निर्यातीस जात आहेत. वाशी बाजारसमितीमधून हा आंबा परदेशात निर्यात होणार आहे.
भारतीय आंबे, विशेषत: कोकणातील हापूस, मराठवाड्यातील केसर तसेच गुजरातमधील आंबे हे निर्यातीचे साहित्य आहेत. महाराष्ट्रातील बराच आंबा हा आखाती देशामध्ये जातो. परंतु बहुतेक शेतकरी आणि निर्यात हे विकसित देशांना लक्ष्य करतात कारण परतावा चांगला असतो. भारतीय शेतकरी २.४ लाख हेक्टरवर आंबा पिकवतात आणि अंदाजानुसार, या हंगामात २१.७९ दशलक्ष टन आंब्याचे उत्पादन होईल. २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताने २२९६३.७६ टन फळांची निर्यात केली होती.
SL/ML/SL
12 April 2024