मायक्रोसॉफ्टच्या ११ हजार कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर नोकरकपातीची टांगती तलवार

 मायक्रोसॉफ्टच्या ११ हजार कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर नोकरकपातीची टांगती तलवार

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मागील काही दिवसात तुम्ही ट्विटर मेटा सारख्या अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांकरून करण्यात आलेल्या नोकरकपाती बद्दल बातम्या ऐकल्या असतील, आता त्या यादीत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनी हि येण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्ट कडूनही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केली जाण्याची शक्यता आहे. या कारवाईला आजपासूनच सुरवात होणार आहे.The sword of job cuts hangs over the heads of Microsoft’s 11,000 employees

सुंत्रांकडून आलेल्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये जवळपास ५ टक्के कर्मचारीकपात केली जाणार आहे. या कारवाईअंतर्गत एकूण ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाण्याची शक्यात आहे. आजपासूनच त्याची सुरुवात होणार असून मुख्यत्वे मनुष्यबळ आणि इंजिनिअरिंग या विभागांत ही नोकरकपात केली जाऊ शकते.

मायक्रोसॉफ्ट कंपनीत जगभरात ३ लाख २१ हजार कर्मचारी पूर्णवेळ काम करतात. यामध्ये एकट्या अमेरिकेत १ लाख २२ हजार कर्मचारी आहेत. तर ९९ हजार कर्मचारी हे जगभरात विस्तारलेले आहेत. मागील काही दिवसांपासून पर्सनल कॉम्प्यूटर विक्री क्षेत्रात मंदी आहे. त्याचा फटका मायक्रोसॉफ्ट या कंपनीला बसलेला आहे. याच कारणामुळे मायक्रोसॉफ्टकडून हा निर्णय घेण्यात येतोय. मायक्रोसॉफ्टने मागील वर्षी जुलै महिन्यातच काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. Axios या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यात जवळपास १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.The sword of job cuts hangs over the heads of Microsoft’s 11,000 employees
ML/KA/PGB
18 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *