सर्वोच्च न्यायालयाने सुरू केले मासिक वृत्तपत्र

 सर्वोच्च न्यायालयाने सुरू केले मासिक वृत्तपत्र

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कामकाजाच्या पद्धती, चालू सुनावणी आणि उपलब्धी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मासिक वृत्तपत्र सुरू केले आहे. त्याला ‘सुप्रीम कोर्ट क्रॉनिकल’ असे नाव देण्यात आले आहे.

या वृत्तपत्राबाबत बोलताना सर न्यायाधीश न्या. चंद्रचूड म्हणाले की, मला आशा आहे की हे वृत्तपत्र न्याय वितरण प्रक्रियेवर प्रकाश टाकेल. यासोबतच न्यायालयाचे कामकाज सुधारण्यासाठी किती सातत्याने प्रयत्न केले जातात, हेही लोकांना कळेल. यासह न्यायालयासाठी पारदर्शकता, प्रतिबद्धता आणि सुधारणेचा नवा प्रवास सुरू होत आहे. मला खात्री आहे की हे वृत्तपत्र सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या पद्धतींबद्दल माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत बनेल. याद्वारे लोकांना न्यायालयाच्या आतील आणि बाहेरील सर्व माहिती मिळू शकणार आहे.” The Supreme Court started a monthly newspaper
SL/KA/SL
18 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *