सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली धनगर आरक्षणाची याचिका

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीला सरकारने शिताफीने बगल दिल्यानंतर आता धनगर आरक्षणाची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने मोडीत काढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली आहे. अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाने दाखल याचिकेला नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आदिवासी हक्क संरक्षण समितीचे सचिव सुहास नाईक यांनी आव्हान दिले होते. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाची याचिका फेटाळून लावली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आव्हान देत नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देत न्यायालयाने धनगर समाजाची याचिका फेटाळली होती. या निर्णयासंदर्भात समाजाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. नाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा कॅव्हेट दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली आहे.
धनगर आणि धनगड हे एकच आहे अस सांगत धनगर समाजाला अनुसुचित जमाती मधून आरक्षण मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. तर सध्या धनगर समाजाला NT प्रवर्गातील आरक्षण लागू आहे. मात्र मध्यप्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्यात धनगड समाजाला अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आरक्षण आहे. मात्र इंग्रजीत उच्चार करताना D चा उच्चार R असा करण्यात आला आहे. त्यामुळे धनगर आणि धनगड एकच असल्याचा युक्तिवाद करीत धनगर समाजाने ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र धनगर आणि धनगड वेगळे असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. तो निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
SL/ML/SL
19 April 2024