सर्वोच्च न्यायालयाने नाकारला ‘द केरळ स्टोरी’ प्रकरणी हस्तक्षेप

 सर्वोच्च न्यायालयाने नाकारला ‘द केरळ स्टोरी’ प्रकरणी हस्तक्षेप

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या प्रदर्शित होत असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. द केरळ स्टोरी’या चित्रपटाविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदच्या वकिलांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र जमियतच्या सीबीएफसी प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

अनेक राजकीय पक्षांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला असून त्यावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत याआधी देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र तेव्हाही याबाबत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये ते द्वेषयुक्त भाषणाला प्रोत्साहन देत असल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर रिलीज होताच देशभरात खळबळ उडाली आहे. या चित्रपटात हिंदू मुलींचे ब्रेनवॉश करून धर्मांतर करून त्यांचा दहशतीसाठी कसा वापर केला जातो हे दाखवण्यात आले आहे. सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी, विजय कृष्णा, प्रणय पचौरी, प्रणव मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

SL/KA/SL

4 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *