सर्वोच्च न्यायालयाने अखेर इडी च्या संचालकांना दिली मुदत वाढ

 सर्वोच्च न्यायालयाने अखेर इडी च्या संचालकांना दिली मुदत वाढ

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याची केंद्र सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयात मंजूर करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत या पदावर कायम राहण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच कोर्टाने असेही म्हटले आहे की, सामान्य परिस्थितीत याला परवानगी नाही, पण जनहितासाठी आम्ही ते मान्य करतो, मात्र त्यांचा कार्यकाळ आणखी वाढवण्याची परवानगी दिली जाणार नाही.26 जुलै रोजी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी अर्ज दाखल केला.

यापूर्वी 11 जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने मिश्रा यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवण्याचा केंद्राचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.त्यावर केंद्राने म्हटले होते की, फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सचा आढावा सुरू आहे, त्यामुळे संजय यांना 15 ऑक्टोबरपर्यंत पदावर राहण्याची परवानगी द्यावी,अशी विनंती केली होती.

भारतीय महसूल सेवेत 1984 मध्ये दाखल झालेले संजय मिश्रा 34 वर्षे आयकर विभागात कार्यरत आहेत. त्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या विदेशी कर विभागात म्हणजे CBDT मध्येही काम केले आहे. याद्वारे भारतीयांनी परदेशात पैसा लपवून ठेवल्याच्या प्रकरणांचा तपास करतात.या प्रकरणांव्यतिरिक्त, त्यांनी येस बँकेचे राणा कपूर, आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर, नेहरू-गांधी कुटुंबाशी संबंधित नॅशनल हेराल्ड प्रकरणासह तपासाचे नेतृत्व केले आहे.

SL/KA/SL

27 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *