ऊसदर आंदोलन अधिक आक्रमक, महामार्ग अडवला

 ऊसदर आंदोलन अधिक आक्रमक, महामार्ग अडवला

कोल्हापूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे बेंगरुळू राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 70 वाहने अडवल्याने वाहतूक खोळंबली होती. भाजपा कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला आणखी धार आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणारी सुमारे 70 वाहने मध्यरात्री शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अडवली होती त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग जाम झाला.काही काळाने पोलिसांनी हस्तक्षेप करून ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या वगळता इतर गाड्यांसाठी रस्ता मोकळा केला.

आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनात ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांबरोबरच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा उतरले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या गळीत हंगामातील 400 रुपये आणि चालू गळीत हंगामासाठी तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड आणि ऊस वाहतूक करू नये. म्हणून शेतकऱ्यांनी आणि ऊस वाहतूकदारानी ऊसतोड थांबून या आंदोलनात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केलं आहे.

ML/KA/SL

14 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *